Mumbai Water Level: तलावक्षेत्रात पावसाची हजेरी! जलसाठ्यात १७ हजार दशलक्ष लिटरने वाढ
Mumbai News: मागील चार दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईतही पाऊस जोरदार पडला आहे. यामुळे मुंबई जलसाठ्यात ७ हजार दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे.
मुंबई : पाऊस सक्रीय झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठ्यात १७,०४० दशलक्ष लिटर इतक्या म्हणजेच चार दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने आज दिली.