esakal | Mumbai: उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात पुन्हा भूस्खलनाची पुनरावृत्ती
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात पुन्हा भूस्खलनाची पुनरावृत्ती

उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात पुन्हा भूस्खलनाची पुनरावृत्ती

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : तीन महिन्यांपूर्वी उल्हासनगरातील ज्या धोबीघाट परिसरामध्ये बाल शिवाजी उद्यानाच्या टेकडीवर भूस्खलन झाले होते,त्याच घटनेची आज पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे.त्यामुळे धोकादायक झालेल्या 3 घरांना खाली करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे टेकडीवरील जमीन भुसभुशीत झाल्याने आज सकाळी 9 कॅम्प नंबर 1 मध्ये बाल शिवाजी उद्यान,कमला नेहरू नगर,धोबीघाट येथील टेकडीचे भूस्खलन होऊन संरक्षण भिंत खाली कोसळली.तहसीलदार कोमल ठाकूर,सहायक आयुक्त गणेश शिंपी,अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.धोकादायक घरामध्ये अडकलेल्या दोन व्यक्तींना व्यक्ती सुखरूप बाहेर काढले.

हेही वाचा: इंदापूर नगरपरिषदेमार्फत कचरा अलग करो अमृतमहोत्सव : अंकिता शहा

शिवसेना नगरसेविका ज्योती गायकवाड,माजी नगरसेवक दिलीप गायकवाड,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे आदींनी घटनास्थळाला भेट दिली असून उपआयुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे यांच्याकडे संरक्षण भिंत उभारण्यासाठी पत्र दिले आहे.मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख,शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी संरक्षण भिंत बांधणीला उशीर करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

19 जुलै रोजी देखिल याच टेकडीवर भूस्खलन होऊन काही घरांचे नुकसान झाले होते.सहायक आयुक्त गणेश शिंपी,अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके यांच्या मदतीने 3 धोकादायक घरे खाली करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कोमल ठाकूर यांनी दिली.

loading image
go to top