
विशाखा कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्याच्या कामगार आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई ः कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी असलेल्या विशाखा कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्याच्या कामगार आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी शनिवारी कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर तसेच उपायुक्त निलांबरी भोसले यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. नोकरदार महिलांना त्यांच्या या विषयावरील तक्रारी त्वरेने आणि गोपनीय पद्धतीनेही करता याव्यात यासाठी संपर्क यंत्रणा (हेल्पलाइन) उभारावी, असेही त्यांनी सूचवले.
या कायद्याप्रमाणे शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे हे मालकांवर बंधनकारक आहे. तरीही विशेषत: खासगी आस्थापनांमध्ये या नियमाचे सर्रास उल्लंघन होते. नोकरी जाण्याच्या भीतीने खाजगी आस्थापनेतील महिला लैंगिक सतावणुकीची तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
खासगी आस्थापनांवर सरकारचा कुठलाही अंकुश नसल्याने तिथे महिलांचे शोषण होण्याची शक्यताही अधिक आहे, असे आढळून आले आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध दाद मागण्यासाठी विशाखा कायदा आहे, याची अनेक नोकरदार महिलांना माहितीही नसल्याची बाब वाघ यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
---------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
mumbai latest marathi news updates Awareness needed implementation Visakha Act demand BJP