esakal | कोरोना कर किंवा उपकर लावण्याचा विचार नाही; निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना कर किंवा उपकर लावण्याचा विचार नाही; निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

निर्मला सीतारामन यांनी आपल्या आजच्या दौऱ्यामध्ये विविध उद्योगपतींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्थसंकल्पानंतरचा त्यांचा आजचा पहिलाच दौरा होता. 

कोरोना कर किंवा उपकर लावण्याचा विचार नाही; निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई  : केंद्र सरकार कोरोना कर लावणार असल्याची उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे; परंतु ती फोल आहे. कोरोना कर किंवा उपकर लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (ता. 7) स्पष्ट केले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी कार्यक्रमात माहिती दिली. 

कोरोना कर किंवा उपकर लावण्याबाबत प्रसारमाध्यमांतून चर्चा सुरू झाली. ती का आणि कशी सुरू झाली, याची मला माहिती नाही; परंतु केंद्र सरकारने असा कोणताही कर लावण्याचा कधीही विचार केलेला नाही, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. कोरोना संसर्गाच्या काळात जागतिक स्तरावरील विकसित अर्थव्यवस्था संघर्ष करत होत्या. तेव्हा भारताने त्यातून योग्य पावले उचलत बचावाचा मार्ग शोधून काढला. प्रथमच करदात्यांच्या पैशांचा वापर योग्य पद्धतीने आणि विचारविनिमय करून करण्यात आला, असे मत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. 
देशाच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेसारख्या 20 संस्था असण्याची आवश्‍यकता आहे. गेल्या तीन महिन्यांत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन विक्रमी स्तरावर झाले आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून काही सरकारी संस्थांमधील हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबतचे आरोप फेटाळत त्यांनी, केंद्र सरकारचे निर्गुंतवणुकीबाबतचे धोरण स्पष्ट असल्याचे सांगितले. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

निर्मला सीतारामन यांनी आपल्या आजच्या दौऱ्यामध्ये विविध उद्योगपतींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अर्थसंकल्पानंतरचा त्यांचा आजचा पहिलाच दौरा होता. 

स्वागत आणि विरोध 
अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे मुंबईत आगमन झाले. विमानतळाबाहेर भाजपच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीही काढली. निर्मला सीतारामन यांनी विमानतळाहून दादरमधील भाजपच्या कार्यालयात भेट दिली. त्यांचे विमानतळावर आगमन होताच, कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai latest marathi no Corona levy taxes or cess Nirmala Sitharamans political updates