आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक

अनिश पाटील
Tuesday, 2 February 2021

डीसी डिझाईनचे संस्थापक-प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला 25 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी 22 जानेवारीला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मुंबई - डीसी डिझाईनचे संस्थापक-प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया याला 25 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी 22 जानेवारीला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

2016 ते 18 च्या दरम्यान छाब्रियाने एका ऑटो पार्ट विक्रेत्याकडून कारचे सुटे भाग खरेदी केले व त्याची रक्कम दिली नाही, असा छाब्रियाविरोधात आरोप आहे. व्यावसायिक चेन्नई येथील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 18 कोटी रुपये येणेबाकी आहे; पण व्याज पकडून ही रक्कम 22 कोटींपर्यंत पोहोचते. याप्रकरणी शनिवारी त्याला अटक केली असून, न्यायालयाने छाब्रियाला याप्रकरणी 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नरिमन पॉईंट परिसरात एक बनावट नंबर प्लेट असलेली स्पोर्टस्‌ कार येणार आहे. त्यानुसार सचिन वझे यांनी सापळा लावला होता. या कारची झडती घेतली असता कारवर बनावट नंबर प्लेट असल्याचे निदर्शनास आले. त्याचा चेसी नंबरही बदलल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार छाब्रियाचे बिंग फुटले. तसेच छाब्रियाने त्याच्या कंपनीतून 120 स्पोर्टस्‌ कार देश-परदेशात विकल्या. यातील सरासरी एका कारवर 42 लाख एवढे कर्ज असल्याचे समोर आले. यातील 90 कारमध्ये घोटाळा असून तपास सुरू आहे.

सकाळ सन्मान सोहळा | ''सकाळची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद''; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ सन्मान सोहळा | आरोग्यदायी महाराष्ट्र हेच आपले व्हिजन; आरोग्य मंत्री राजेश टोपे

पोलिसांनी कार ताब्यात घेत छाब्रियाला अटक केली होती. ही कार चेन्नई येथे रजिस्टर असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांचा मुलगा बोनिटो छाब्रिया याच्याविरोधातही गुन्हा दाखल आहे. क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने या कंपनीचा मालक छाब्रियाविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्याने दिनेश कार्तिकला कार देतो असे सांगत 5 लाख रुपये आगावू घेतल्याचे समोर आले. त्याने कपिल शर्माचीही साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai latest news Famous car designer Dilip Chhabria arrested in financial fraud case


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai latest news Famous car designer Dilip Chhabria arrested in financial fraud case