दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मुस्लिमांनीही सहभागी व्हावे; माजी खासदाराचे आवाहन

दिनेश चिलप मराठे
Sunday, 7 February 2021

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदाराने केले आहे

मुंबई - केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कायद्यांविरुद्ध दिल्ली, हरियाना पंचक्रोशीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. 70 दिवस झाले तरी सरकार कायदा मागे घ्यायला तयार नाही, तर देशातील शेतकरीही मागे हटणार नाहीत. आम्ही एक पक्ष आणि राजकीय व्यक्ती म्हणून आंदोलनाला उघड पाठिंबा देत आहोत. या दिल्लीतील आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आता ही निकराची लढाई असून, सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध असल्याने त्याला मागे घ्यायला सरकारला भाग पाडण्यासाठी मोठा दबाव निर्माण करावा लागेल, असे आवाहन माजी खासदार उदित राज यांनी येथे काढले. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सरहद गांधी मेमोरिअल ट्रस्टतर्फे खान अब्दुल गफ्फार खान यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मेळाव्यात उदित राज बोलत होते. भारतीय समाज जातीपातीत विभागलेला असून, त्याचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला होता. आजही देशात जातपात महत्त्वाची मानली जाते आणि हेच खरे सत्य आहे. समाजाला योग्य नेतृत्व देण्यासाठी सरहद गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांसारख्या व्यक्तिमत्त्वांची खरी गरज आहे. देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारला यात लक्ष द्यायला वेळ नाही. हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण करून देत आहे. लोकभावनेपुढे मोदी सरकारला झुकावेच लागेल. आंदोलन ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपर्यंत पुढे सुरूच राहील, असे उदित राज म्हणाले. या वेळी व्यासपीठावर पत्रकार सबा नक्वी, खासदार हुसैन दलवाई, प्रीती मेनन, वी. के. त्रिपाठी, सुधेंदू कुलकर्णी, ऍड. सय्यद जलालुद्दीन, मौलाना आझाद विचार मंचचे सदस्य उपस्थित होते. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

mumbai latest politics marathi news Muslims should also participate farmers protest udit raj political upadate


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai latest politics marathi news Muslims should also participate farmers protest udit raj political upadate