

मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळ्या जादूशी संबंधित एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाच्या सध्याच्या विश्वस्तांनी असा आरोप केला आहे की माजी विश्वस्तांनी रुग्णालयात काळी जादू केली होती. जमिनीखाली हाडे आणि मानवी केसांनी भरलेले ८ कलश सापडले असा दावा केला आहे. या रहस्यमय घटनेचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान, हॉस्पिटल ट्रस्टने १२५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबद्दल त्यांच्या सात माजी विश्वस्तांसह १७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.