

Mumbai Local
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमध्ये लोकल उभ्या करण्याच्या सुविधांचाही विस्तार करण्यात येणार आहे. गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार आणि बोरिवली-विरारदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका उभारण्यासाठी ३७ विद्यमान लोकल गाड्या उभ्या करण्याच्या मार्गिका (स्टॅबलिंग लाइन्स) हटवण्यात येणार आहेत. त्याऐवजी नायगाव ते भाईंदरदरम्यान रेल्वे कॉरिडॉरच्या पश्चिम बाजूस ३१ नव्या मार्गिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.