
Mumbai Local Train: ठाण्याजवळील मुंब्रा स्थानकात कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुटबोर्डवर लटकून प्रवास करत होते. ते एकमेकांना घासले गेले. त्यामुळे ते खाली पडले अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.