
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन लोकलमध्ये दरवाजात उभा राहून प्रवास करणारे प्रवासी एकमेकांना घासून ही दुर्घटना घडल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. सकाळी साडे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळावर १० ते १२ प्रवासी खाली पडले. यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका जीआरपी पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.