मुंबई : लोकल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; सर्व रेल्वे सुरक्षा यंत्रणा अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : लोकल बॉम्बने उडवून देण्याची धमकी सर्व रेल्वे सुरक्षा यंत्रणा अलर्ट

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलला बॉम्बने उडवून देण्यात येईल, असा धमकीचा फोन वांद्रे रेल्वेस्थानकाच्या आरपीएफला शनिवारी (ता. १३) रात्री आला. त्यानंतर रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिस, आरपीएफ, बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने श्वान पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरू केली. सध्या रेल्वे पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली.

हेही वाचा: पु्ण्याला पंधराव्या वित्त आयोगाचा ५७ कोटींचा निधी प्राप्त

लोकलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी शनिवारी (ता.१३) रात्रीच्या सुमारास वांद्रे आरपीएफकडून दूरध्वनीवरून प्राप्त झाला. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या फोनची माहिती सर्व यंत्रणांना दिली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी करणे सुरू आहे. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून
लोहमार्ग पलिस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली. या धमकीच्या कॉलनंतर तत्काळ रेल्वे पोलिस, आरपीएफ यांच्याद्वारे उपनगरीय लोकलच्या सर्व रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढविली आहे.

loading image
go to top