
Mumbai Local Train: मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दुर्घटनासुद्धा होतात. अलिकडेच झालेल्या दुर्घटनेत दरवाजात उभा राहिलेले प्रवाशी रुळावर पडून अनेकांना जीव गमवावा लागला. आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे कडून मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून शहरातील ८०० कार्यालयांना त्यांच्या ऑफिसच्या वेळेत बदल करण्याचं आवाहन केलंय. यामुळे गर्दीच्या वेळेत रेल्वेसेवेवर ताण येणार नाही. प्रचंड गर्दी कमी करता येईल आणि यामुळे सुरक्षा आणि सुविधा यांमध्ये सुधारणा करता येईल.