

Dadar Railway Station
ESakal
मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेचे मोठे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत येथे ३४ वर्षे जुनी सिग्नल यंत्रणा बदलून अत्याधुनिक सिमेन्स वेस्ट्रेस एमके-२ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली.