
Mumbai latest News: दादर स्थानकावर एका तरुणीचे केस कापून पसार झालेल्या आरोपीला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव दिनेश गायकवाड (वय ३५) असून तो चेंबुरला राहतो. पोलिस चौकशीत मला तरुणी-महिलांचे लांब केस आवडत नसल्याने ही कृती केल्याचे आऱोपीने कबूल केले आहे.या विचित्र घटनेनंतर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो महिलामध्ये असुरक्षेततेची भावना निर्माण झाली आहे.
माटुंग्यातील महाविद्यालय गाठण्यासाठी पीडित तरुणी, सोमवारी (ता.६) कल्याण स्थानकातून महिला विशेष लोकलमध्ये चढली.दादर स्थानकावर सकाळी ९.२९ सुमारास उतरून पश्चिमेला जाणाऱ्या ब्रिजवरून जात असताना, बुकिंग खिडकीजवळ तिला अचानक टोचल्यासारखे जाणवले. मागे वळून पाहिल्यावर काही केस पडल्याचे तिला दिसले.