लोकलचा घातपात करण्याचा डाव; मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे उधळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local

मध्य रेल्वेच्या भायखळा ते सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा डाव मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे उधळलेला आहे.

लोकलचा घातपात करण्याचा डाव; मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे उधळला

मुंबई - मध्य रेल्वेच्या भायखळा ते सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा डाव मोटरमॅनच्या सतर्कतेमुळे उधळलेला आहे. मोटरमॅनने लोखंडी ड्रम पाहून आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठ्या अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रनेची झोप उडाली आहे. या घटनेचा कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने सकाळला दिली आहे.

तब्बल दोन वर्षाच्या कोरोना सावटानंतर मुंबईत निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. या उत्साहात कोणताही घातपात होऊन नयेत, म्हणून सर्वच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. तसेच सणासुदीचे दिवस असल्याने मुंबई पोलिसांना धमकीचेही फोनही आले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलीस पूर्ण सज्ज झाली आहे. तरीही गुरुवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अज्ञान व्यक्तीकडून दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा इराद्याने प्रकार घडला आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटाची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून खोपोली जलद लोकल निघाली होती. सँडहर्स्ट रोड ते भायखळा स्थानकादरम्यान लोकलने गती पकडली. तेव्हा रेल्वे रुळावर एक दगडाने भरलेल्या लोखंडी ड्रम मोटरमॅन अशोक शर्मा यांना दिसून आला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोटरमॅन अशोक शर्मा यांनी इमर्जन्सी ब्रेक मारला. तेव्हा लोकलच्या पहिला डबा ड्रमवरून गेल्याने मोठ्याने आवाज आला. तेव्हा तात्काळ मोटरमॅन अशोक शर्मा यांनी लोकल खाली उतरून प्रवाशांच्या मदतीने हा लोखंडी ड्रम काढण्यात आले. या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी अधिकाऱ्यांनी स्थानकांवर आलेल्या लोकलची पाहणी केली. या पाहणी दरम्यान लोकल सुरक्षित असल्याने खोपोली लोकलला आपल्या गंतव्य स्थानकाकडे रवाना केली.

घटनेनंतर रेल्वेकडून पेट्रोलिंग जोरात

या घटनेसंदर्भात सकाळने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र कुमार श्रीवास्तव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या घटनेची माहिती घेऊन तुम्हाला सांगतोय. मात्र, या घटनेनंतर रेल्वेकडून रेल्वे मार्गाचे पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे. तसेच या घटनेचा कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

प्रतिक्रिया -

भायखळा ते सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान मला रेल्वे रुळावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम दिसून आला. त्यानंतर मी आपत्कालीन ब्रेक लावून लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. तसेच या घटनेची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्ष आणि माझे सहकारी रेल्वे गार्डला दिली. प्रवाशाची सुरक्षित प्रवासही आमची प्राथमिकता आहे.

- अशोक शर्मा, मोटरमॅन मध्य रेल्वे

Web Title: Mumbai Local Danger Spoiled By Vigilance Of The Motorman

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MumbaiLocal TrainDanger