

मुंबई, ता. ३० : मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर झटापटीत होऊन तीन तरुण थेट रेल्वे रुळावर कोसळले. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सकाळी घडली. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण कुर्ला रेल्वे स्थानकावरून सकाळी सुमारे ९.४० वाजताच्या सुमारास कल्याण-सीएसएमटी धीम्या लोकलमध्ये चढले होते. लोकलमध्ये प्रवासादरम्यान त्यांच्यात वाद झाला. हा वाद पुढे झटापटीत रूपांतरित झाला. त्याच वेळी सायन रेल्वे स्थानकादरम्यान हे तिघेही रुळावर पडले.