मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडताना हे पाहाच...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

मुलुंड ते माटुंगा "अप' जलद मार्गावर, सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे व बोरिवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. 

मुंबई -: उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 21) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ते माटुंगा "अप' जलद मार्गावर, सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे व बोरिवली ते भाईंदर या स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. 

मध्य रेल्वे 
मुख्य मार्ग 

कुठे? : मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान सीएसएमटीच्या दिशेला "अप' जलद मार्गावर. 
कधी? : सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत. 
परिणाम : मुलुंड-माटुंगादरम्यान "अप' जलद लोकल धीम्या मार्गावर. लोकल, मेल/एक्‍स्प्रेस सुमारे 20 मिनिटे विलंबाने. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच; याच स्थानकातून पुन्हा रवाना; दादरहून दुपारी 3.40 वाजता विशेष लोकल. 

हार्बर मार्ग 
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' मार्गांवर. 
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत. 
परिणाम : सीएसएमटी ते वडाळा रोड, वांद्रे, गोरेगाव या स्थानकांदरम्यान सकाळी 9.56 ते दुपारी 4.23 वाजेपर्यंत लोकल वाहतूक बंद. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी या स्थानकांदरम्यान सकाळी 9.53 ते दुपारी 2.44 वाजेपर्यंत वाहतूक बंद. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक 8 वरून पनवेलसाठी विशेष लोकल. 

पश्‍चिम रेल्वे 
कुठे : बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' धीम्या मार्गावर. 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. 
परिणाम : धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर; काही लोकल रद्द. 

माहीमला आज रात्रकालीन ब्लॉक 
धारावी येथील पादचारी पुलाच्या पीएससी गर्डरखाली पाईप बसवण्याच्या कामासाठी शनिवारी (ता. 20) मध्यरात्री 12 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत माहीम स्थानकात विशेष ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी हार्बर मार्गावरील रात्री 11.38 ची सीएसएमटी-अंधेरी, 11.52 अंधेरी-सीएसएमटी, मध्यरात्री 12.28 ची अंधेरी-सीएसएमटी व 12.36 ची वांद्रे-सीएसएमटी या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai local mega block