

मुंबई : मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी (ता.२६) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या दोन्ही मार्गांवर रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.