
Mumbai Local
नवी मुंबईतील प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सीवूड दारावे- बेलापूर- उरण रेल्वेमार्गावर आता लोकलच्या आणखी २० फेऱ्या धावणार आहेत. ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकापासून ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. सध्या या मार्गावर प्रवासी संख्या तुलनेने कमी असली, तरी गर्दीच्या वेळी गाड्या एका तासाच्या फरकाने आणि इतर वेळी दीड तासांच्या फरकाने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना बरीच प्रतीक्षा करावी लागते.