Mumbai Local News
Mumbai Local Newssakal

Mumbai Local News: लोकलमधील गर्दीचा आणखी एक बळी; पोलिसाचा लोकलमधून पडून मृत्यू

दिवा - कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाला.

Dombivali News: लोकलने प्रवास करत असताना कोपर रेल्वे स्थानकात दरम्यान लोकलमधून पडून एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने दारात उभे राहून हा प्रवासी प्रवास करत होता. दिवा - कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाला. (mumbai local kopar diva)

Mumbai Local News
Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

रोहित रमेश किळजे (वय 25) असे मयत पोलिसाचे नाव आहे. तो डोंबिवलीत राहत होता. मुंबईतील ताडदेव पोलीस मुख्यालयात तो कर्तव्यावर होता. रोहित बुधवारी सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले होते. डोंबिवली रेल्वे स्थानकात त्यांनी सकाळची लोकल पकडली. पण लोकलचा डबा प्रवाशांनी खच्चून भरला होता(maharashta news)

Mumbai Local News
Mumbai Local Crime: धावत्या लोकलमध्ये दहा वर्षीय मुलीची छेड

लोकल अतिजलद असल्याने रोहित यांनी डब्यात जागा नसली तरी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास सुरू केला. कोपर रेल्वे स्थानकानंतर लोकलने वेग घेताच रोहितने दरवाजाच्या कडीला पकडलेला हात त्याचा तोल सांभाळू शकला नाही. प्रवाशांचा भार अंगावर येऊ लागल्याने रोहितचा दरवाजाच्या दांडीचा हात निसटला आणि तो रेल्वे मार्गात पडला.(railway news)

त्याच लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गलका केला. लोकल गार्डने ही माहिती डोंबिवली आणि कोपर स्थानक प्रमुखांना दिली. कोपर स्थानकाजवळ पडलेल्या रोहितपर्यंत पोलिस पोहोचले, तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रोहितचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला.(mumbai local news )

Mumbai Local News
Mumbai Local News: रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे 'फलाट' करतायेत गर्दीमुक्तीच्या दिशेने वाटचाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com