मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता भिरभिरणार तिसरा डोळा

मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता भिरभिरणार तिसरा डोळा

मुंबई,ता. 3 : मध्य रेल्वे मार्गावर गुन्हे घडणाऱ्या ठिकाणी ड्रोनद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे परिसरातील, रेल्वे ट्रॅक, यार्ड, वर्कशॉप क्षेत्रात सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी निन्जा यूएव्ही ड्रोन खरेदी केला आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या एक ड्रोन असून काही दिवसात आणखीन एक ड्रोन दाखल होणार आहे. ड्रोनमुळे गुन्हेगारीस आळा बसविता येणार आहे, असा विश्वास मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागाला आहे. 

मध्य रेल्वे परिसरातील गुन्हेगारी होणाऱ्या ठिकाणी आकाशातून पाळत ठेवण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. जुगार खेळणे, कचरा टाकणे, अवैध फेरीवाले, स्टंटबाजी, फटका गॅंग वाढली आहे. तसेच इतर गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

ड्रोनची वैशिष्ट्ये
- मध्य रेल्वे विभागाने 3 लाख 50 हजारांमध्ये एक ड्रोन खरेदी केला आहे. 
- ड्रोनला 2 किमीच्या परिसरातून कंट्रोल करता येणार आहे. 
- 25 मिनिटांपर्यंत ते हवेत उड्डाण करू शकते. 
- दिवसा 1280x720 पिक्सेल वर एचडी फोटो काढू शकतो.
 - रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हिडिओ, सेफ्टी मोड या सुविधा उपलब्ध आहेत

रेल्वे परिसरात अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी, रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी रेल्वे मालमत्तेचे मॅपिंग करण्यासाठी, आपत्ती काळात मदत कार्य पुरविण्यासाठी, गंभीर परिस्थितीत आणि सणासुदीच्या काळात गर्दीचे निरीक्षण/व्यवस्थापन करण्यासाठी, रेल्वे परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास गुन्हेगाराला त्वरित अटक करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ड्रोनच्या माध्यमातून पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे साधन आहे. ड्रोनद्वारे रेल्वे परिसरात कानाकोपऱ्यात लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. ड्रोनचा वापर करण्यासाठी आरपीएफच्या सात कर्मचार्‍यांच्या पथकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. या ड्रोन्स उड्डाणासाठी सर्व परवानगी मिळाल्या आहेत.  - जितेंद्र श्रीवास्तव, विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे 

mumbai local news central railways to use drones for surveillance on the stations

.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com