शिवसेनेचं हिंदुत्व 'शेंडी - जान्हव्यांचे' नाही; ठाकरेंच्या फटकार्यांनी विरोधी भाजपा घायाळ !

शिवसेनेचं हिंदुत्व 'शेंडी - जान्हव्यांचे' नाही; ठाकरेंच्या फटकार्यांनी विरोधी भाजपा घायाळ !

मुंबई, ता. 3 : "बाबरी मशिद प्रकरणानंतर पळ काढणार्यांनी शिवसेनेला हिणवू नये. आमचं हिंदुत्व केवळ शेंडी अन जान्हव्यांचे नाही." असे आक्रमक फटकारे लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला विधानसभेत लक्ष्य केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत विरोधी पक्षाच्या आरोपांची व टीकेची खिल्ली उडवली. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत सहभागी होताना महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. या सर्व आरोपांना उत्तर देताना ठाकरे यांनी राजकिय कोपरखळ्या मारत आक्रमक शैलित प्रत्यूत्तर दिले. 

कोरोनाच्या काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, "जगावर संकट असताना आपल्या राज्यात मात्र कोरोनावरून सुरू असलेले राजकारण निंदनिय आहे. महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी पाच रूपयांत शिवभोजनाच्या थाळीची व्यवस्था केली. याऊलट तुम्ही रिकाम्या थाळ्या वाजवून कोरोना विरोधात लढायला सांगितले. आम्ही जनतेच्या पोटची भूख भागावी म्हणून भरलेली शिवभोजन थाळी दिली तर तुम्ही त्याच जनतेच्या हातात रिकामी थाळी दिली. तुमच्या अन आमच्या सरकारमधे हाच फरक असल्याचा टोला ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. 

दरम्यान हिंदुत्वावरून ठाकरे आज विरोधकांवर आक्रमक झाले. ज्या सावरकरांचे नाव घेवून तुम्ही हिंदुत्व गाजवता त्या सावरकरांना दिल्लीतल्या सरकारने का भारतरत्न दिला नाही ? असा सवाल करत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करूनच दाखवू. पण त्याअगोदर केंद्र सरकारला राज्याने औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देण्याचा पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन केले. 

संत नामदेव महाराज यांचे नाव महापुरूषांच्या यादीत जरूर टाकू अशी घोषणाही ठाकरे यांनी केली. मात्र ज्या विरोधी पक्षनेत्यांनी ही मागणी केली त्यांनी संत नामदेवानी पंजाब मधे शेतकरी समाजासाठी दिलेले योगदान लक्षात घ्यावे. आज पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला आहे. त्यांना रोखण्यासाठी वाटेत काटरी कुंपन लावली असून रस्त्यावर खिळे ठोकले अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव घेत ठाकरे यांनी युतीच्या बाबत बंद खोलीतल्या चर्चेचा समाचार घेतला. खोटं बोल पण रेटून बोला अशी संस्कृती विरोधकांची असल्याची टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली. 

दरम्यान भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी  शिवसेना नव्हती अशी माहिती देतानाच भाजपची मातृसंस्था मानल्या जाणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सहभाग नव्हता. मात्र स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना आपलेच नेते म्हणवून घेण्यात भाजप धन्यता मानतो. महात्मा गांधींना यांनी आपले केले. अन आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असणार्या मैदानाचे नावही बदलले. असा टोला लगावत स्वतःच्या पक्षाला नेते तयार करता आले नाहीत पण दुसर्यांचे नेते आपले म्हणून मोठे होण्याची पध्दत सुरू असल्याची टीका ठाकरे यांनी केली. 

नटसम्राट मुनगंठीवार 

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी भाजपा आमदार सुधीर मुनगंठीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुनगंठीवार यांच्या दिर्घ व आक्रमक भाषणाला प्रत्तूत्तर देताना ठाकरे यांनी मुनगंठीवार यांना नटसम्राट ची उपमा दिली. सुधीरभाऊ आपण उत्तम कलाकार आहात. आपले भाषण ऐकताना नटसम्राट ची आठवण होते असा टोला लगावला. आपली ही कला अशीच जपून ठेवा. पण कलाकारांना आपल्या क्षेत्रात न्याय मिळत नाही याची खंत असल्याची कोपरखळी लगावली. 

mumbai news maharashtra CM uddhav taunts BJP over hindutava in assembly speech 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com