Mumbai Local News: आपत्कालीन ब्लॉकमुळे आठ लोकल रद्द, प्रवाशांचे हालsakal
मुंबई
Mumbai Local News: आपत्कालीन ब्लॉकमुळे आठ लोकल रद्द, प्रवाशांचे हाल
Mumbai Local Mega Block: दुपारी मुंबईतील उन्हाची तीव्रता जास्त असल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली.
Mumbai Latest news: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते सायन स्थानकांदरम्यान मंगळवारी आधी २३ आणि नंतर २० मिनिटांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्यात आला. यामुळे आठ लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे दुपारच्या रणरणत्या उन्हात प्रचंड हाल झाले.
रूळ, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाला इमर्जन्सी ब्लॉक घ्यावे लागतात. हे ब्लॉक तत्काळ घ्यावे लागत असल्याने प्रवाशांना त्याबाबत आधी माहिती देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही; परंतु अशा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी सुरक्षित वाहतुकीकरिता ते महत्त्वाचे असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.