Mumbai Local News: पनवेल ते कर्जत मार्गावरील सर्वाधिक लांब रेल्वे बोगद्याचे खोदकाम पूर्ण!

पनवेल-कर्जत मार्गावरील बोगद्याचे काम पूर्ण; प्रकल्पाची प्रगती ७२% | Tunnel work on Panvel-Karjat route completed; Project Progress 72%
Mumbai Local News
Mumbai Local News

अडीच हजार कोटीपेक्षा रुपयांचा असलेल्या पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक लांब बोगद्याचे भूमिगत खोदकाम पूर्ण झाले आहेत.उर्वरित कामे प्रगतीपथावर असून आतापर्यंत तिन्ही बोगद्याचे काम ७२ टक्के झाल्याची माहिती एमआरव्हीसीने दिली आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतला आहे. आतापर्यत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या नव्या रेल्वे मार्गावर एकूण ३१४४ मीटर लांबीचे नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येत आहे.

या तिन्ही बोगदाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. यापैकी वावर्ले बोगदा हा २६२५ मीटर लांबीचा आहे. आतापर्यत २६२५ मीटरपैकी २०३८ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले.

Mumbai Local News
Mumbai Local Train News: वाशी स्टेशनमध्ये तरुण ट्रेनखाली अडकला, पाहा प्रवाशांनी काय लढवली शक्कल

पुढील काम प्रगतीपथावर आहे. तर नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर असून आतापर्यत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. तर किरवली बोगदा ३०० मीटर लांबीचा असून ३०० मीटरपैकी २३४ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. तीनही बोगद्यांच्या भूमिगत उत्खननाचे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे.

डिसेंबर २०२५ पर्यत प्रकल्प होणार पूर्ण -

पनवेल-कर्जत या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वे मार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके आहे. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे होणार आहेत. ३.१२ किमीचे तीन रेल्वे बोगदे असणार आहेत.

Mumbai Local News
Mumbai Local News: मुंबईची 'लाईफलाईन' होत आहे लेट; तांबेंची नाराजी

तसेच या रेल्वेमार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल असणार आहे. या सर्वांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्गिका उभारण्यासाठी २ हजार ८१२ कोटी रुपये खर्च लागणार आहे. तसेच हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसी ठेवले आहे.

या बोगद्याच्या आतील रेल्वे मार्ग हा गिट्टीरहीत असणार आहे.बोगदा नियंत्रण यंत्रणा, उत्तम प्रकाशव्यवस्था, अत्याधुनिक वेंटिलेशन यंत्रणेसारख्या आधुनिक सुविधेने हा भूमिगत रेल्वे मार्ग सुसज्ज असणार आहे.

सुभाष गुप्ता,अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

Mumbai Local News
Mumbai Local News : उरणवरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यत रेल्वे लोकल सेवा सुरू करा - महेश बाळदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com