मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी; मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

सुमित बागुल
Wednesday, 27 January 2021

वाढीव फेऱ्यांमधून सध्याच्या रेल्वे नियमानुसारच परवानगी असणाऱ्या प्रवाशांनाच लोलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी बंद आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी असली तरीही सर्वसामान्य जनतेला ट्रेनचा प्रवास अजूनही करता येत नाही.

वेळोवेळी सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आल्यात. दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आणि युरोपीय देशांमध्ये आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन यामुळे खबरदारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलला गेला.

महत्त्वाची बातमी : तीराला एक इंजेक्शन द्यायचं आहे, ज्याची किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे

मात्र आता मुंबईतील कोरोना रुगणसख्या आटोक्यात आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत देखील घट झालीये, तर कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा दर तब्बल दीड वर्षांच्या वर गेलाय. अशात पुन्हा एकदा मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक देखील घेण्यात आली. 

सर्वसामान्य नागरिकांसाठी रेल्वे खुली करण्याआधी येत्या शुक्रवारपासून लोकल फेऱ्यांमध्ये आणखीन वाढ करण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर सध्या 1580 लोकल फेऱ्या सुरु आहेत त्या वाढवून आता 1685 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या 1201 वरून 1300 वर नेत्या जाणार आहेत.

महत्त्वाची बातमी :  अंबरनाथ बदलापूर दरम्यान ट्रॅक रेलिंग ट्रेनचा अपघात, एक ठार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

येत्या २९ तारखेपासून या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सर्वसामान्य नागरिकांना लवकरच लोकल ने प्रवासाची मुभा दिली जाईल असं मुख्यमंत्री म्हणालेत. मात्र वाढीव फेऱ्यांमधून सध्याच्या रेल्वे नियमानुसारच परवानगी असणाऱ्या प्रवाशांनाच लोलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

mumbai local news update frequency of local trains to increase on central and western railways


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai local news update frequency of local trains to increase on central and western railways