Exclusive News:विना तिकीट प्रवास आता महागणार! आता २५० वरून थेट किमान दंड ५०० रुपये!

Ticketless Travel to Become Costlier: मुंबई लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा धक्का. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये होण्याची शक्यता.
Exclusive News

Exclusive News

esakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वेवर देशातील सर्वाधिक विना तिकीट प्रवासाची प्रकरणे नोंदवली जात असताना, अशा प्रवाशांना लवकरच अधिक आर्थिक फटका बसणार आहे. जनविश्वास (दुरुस्ती) कायदा-२०२६ अंतर्गत रेल्वे कायद्यात करण्यात आलेल्या बदलांनुसार, विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना संपूर्ण भाड्यासह किमान ५०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. सध्या असलेले किमान २५० रुपयांचे अतिरिक्त शुल्क दुप्पट होणार असून, रेल्वे मंडळाच्या स्वतंत्र अधिसूचनेनंतर ही तरतूद लागू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com