

मुंबई : बेलापूर आणि पनवेलदरम्यान विविध अभियांत्रिकी कामांसाठी शनिवार (ता. २२) मध्यरात्री ते रविवार (ता. २३) दुपारपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री २३.४५ वाजेपासून ते रविवारी सकाळी ११.४५ वाजेपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वेमार्फत पनवेल स्थानकाच्या मुंबई दिशेला (डाऊन हार्बर मार्गावर) असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर टर्न आऊट्सचे हटविणे, सरकविणे/स्लीविंग करणे आणि बसविणे या कामांसाठी बेलापूर आणि पनवेलदरम्यान अप व डाऊन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.