

Mumbai Local Megablock for 78 days
ESakal
मुंबई : मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा ऐतिहासिक ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरु असून रविवार (ता. १) रोजी पूल पाडण्याचा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. या पुलाच्या पाडण्याचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्याजागी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. या पाडकामादरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेने महत्त्वाची माहिती दिली आहे.