Mumbai Local Accident: अंत्यसंस्काराला निघाला… पण स्वतःचाच अंत झाला! मुंबई लोकलमधील हृदयद्रावक घटना
Mumbai local train : मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर कोपर ते दिवा दरम्यान गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडून ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी जाताना घडली दुर्दैवी घटना
मुंबई : धावत्या लोकलमधून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर घडली. नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी दादरला जाणाऱ्या या तरुणाला वाटेतच काळाने गाठले.