
Mumbai Local Blast 2006 : मुंबई लोकलच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या ११ जुलैच्या साखळी बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपींची उच्च न्यायालायाने निर्दोष मुक्तता केली आहे. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाची आठवण करुन देणाऱ्या या साखळी स्फोटामध्ये २०९ लोकांचा बळी गेला. लोकलच्या पश्चिम मार्गावर प्रवाशांनी खच्चून भरलेल्या उपनगरी गाड्यांमध्ये हे सात शक्तिशाली व भीषण बाँबस्फोट झाले. यात ४०० हून अधिक जण जखमी झाले. हे सर्व स्फोट धावत्या लोकलच्या पहिल्या वर्गाच्या डब्यांत झाले. या स्फोटांनी सारी मुंबई हादरली आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद पडली.