esakal | MUMBAI TRAIN : आता ठरलं, आंदोलनाशिवाय पर्याय नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

MUMBAI TRAIN : आता ठरलं, आंदोलनाशिवाय पर्याय नाही!

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून लोकल बंद (Local train Closed) असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. प्रशासन, सरकारला अनेकदा निवेदने देऊन सुद्धा लोकल सुरू होत नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय (Strike) पर्याय नाही, अशी भूमिका प्रवासी संघटनेकडून (Travelers union) मांडण्यात आली. कोरोना लसीचे (Corona vaccination) दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना (Common People) लोकल प्रवासाची परवानगी मिळत नाही. त्यामुळे आता सीएसएमटी, मंत्रालय (Mantralay) येथे आंदोलन करण्याचे प्रवासी संघटनेने नियोजन केले आहे. ( Mumbai local train doesn't start for common people strike is an only option)

सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगोदरच पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे कमी पगार असणाऱ्या  सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्च ही पेलवेनासा झाला आहे. कारण मुंबईत कामाला येणारे अनेक नागरिक कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून येतात. मात्र, इंधन दरवाढीमुळे रस्ते मार्गाने मुंबई गाठणे खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे निधान लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने केली आहे.

हेही वाचा: डिसेंबर २०२२ पर्यंत मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार पूर्ण : PWD

एकीकडे कोरोना रूग्ण कमी होत असताना पुन्हा तिसरी लाट येईल, अशी नागरिकांना भीती दाखविण्यात येते. आता अनेक क्षेत्रातील निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे लोकल प्रवास करण्यासाठी नागरिकांना शिथिलता देणे आवश्यक आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याला लोकल प्रवासाची परवानगी दिली पाहिजे. कोरोना लस घेतल्यानंतर आंतर राज्य प्रवास, पर्यटनस्थळी फिरण्याची मुभा आहे. लस घेतल्यानंतर विदेशी प्रवासाला देखील परवानगी मिळते. असे असताना केवळ मुंबई लोकललाच हा नियम लागू का केला जात नाही ? असा प्रश्न कळवा-पारसिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिध्देश देसाई यांनी उपस्थितीत केला आहे. शहरातील कोरोना बधितांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे, सभा, उदघाटन कार्यक्रम प्रचंड गर्दीत बिनदिक्कतपणे सुरू आहे. या कार्यक्रमात सुरक्षित वावर नियम खुलेआम पायदळी तुडवला जातो. दुसरीकडे सामान्य मुंबईकर, नोकरदार आणि श्रमिक वर्गाला मात्र लोकल प्रवासावर बंदी घातली आहे, असे देसाई यांनी सांगितले.

- लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल  प्रवासाची मुभा द्यावी.

- क्यूआर कोड यंत्रणा सर्व रेल्वे स्टेशनवर कार्यान्वित करण्यात यावी.

- स्टेशनमध्ये आणि बाहेर गर्दी होऊ नये म्हणून मेट्रोच्या धर्तीवर यंत्रणा उभारावी तसेच प्रत्येक स्टेशन वर प्रवास्यांची मर्यादा ठरवून तासाला तेवढ्याच प्रवास्यांना - - मास्क आणि बाकीचे नियम पाळून प्रवेश द्यावा.

- स्टेशन बाहेर फेरीवाल्यांची गर्दी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी.

- स्टेशन आतमध्ये रेल्वे तसेच स्टेशन परिसराची जवाबदारी राज्य सरकार ने घेऊन पोलीस यंत्रणे कडून अधिकारी नेमावे.

loading image