

Mumbai Local Train
Esakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा विस्तार आणि प्रवाशांना अधिक वेगवान, सुरळीत सेवा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अनेक रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देणे, लोकलच्या फेऱ्या वाढविणे आणि वेळापत्रकावरील ताण कमी करणे, हा या प्रकल्पांचा उद्देश आहे; मात्र जमीन अधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पांच्या कामाला 'ब्रेक' लागला आहे. काही प्रकल्पांच्या निर्धारित मुदती संपल्या असून, अनेकांच्या नव्या मुदती अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.