

Shocking! AC Local Overshoots Bhandup Platform, Passengers Left Terrified
esakal
Mumbai AC Local Train Incident: मुंबई उपनगरीय रेल्वेच्या नेहमीच्या वाहतुकीत १७ मार्च सकाळी एक अनपेक्षित प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणकडे जाणारी ९५७११ क्रमांकाची एअर-कंडिशन्ड लोकल गाडी भांडूप स्थानकातील फलाटावर थांबण्याऐवजी दोन डबे पूर्णपणे पुढे निघून गेले. यामुळे प्रवाशांमध्ये चिंतेची लहर पसरली, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना टाळली गेली.