esakal | मुंबईच्या लोकलवर नजर ठेवणार ISS चे 2729 कॅमेरे
sakal

बोलून बातमी शोधा

Western Railway

मुंबईच्या लोकलवर नजर ठेवणार ISS चे 2729 कॅमेरे

sakal_logo
By
सुधीर काकडे

पश्मि रेल्वे विभागाने मुंबई आणि लोकलच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेत, ISS ही नवीन सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. गेल्या काही दिवसापांसून मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण होणारे प्रश्न आणि येणाऱ्या काळातील आव्हानांच्या पार्श्वभुमीवर पश्चिम रेल्वे विभागाकडून खास तयारी करण्यात आली आहे. आता लोकलच्या 30 स्थानकांवरती ISS अर्थात इंटिग्रेटेड सर्व्हिलन्स सिस्टिम नजर ठेवणार आहे. या अंतर्गत या लोकल स्थानंकांवर अडीच हजारपेक्षा जास्त कॅमेरे लावण्यात आले आहेत.

हेही वाचा: वाहतूक पोलिसाला फरफटत नेणार्‍या हुंदाई कारचालकास अटक

एकूण 2729 कॅमेरे

पश्चिम रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील रेल्वे स्थानकांवर एकूण 2729 कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण होणारे प्रश्न पाहता रेल्वे पोलिसांना या यंत्रणेची मोठी मदत होणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे रेल्वे स्थानकावर होणारे वेगवेळे गुन्हे आणि गैरप्रकारांना आळा घालता येणार आहे. या 2729 कॅमेऱ्यांपैकी 450 कॅमेऱ्यांमध्ये फेस रेकॉग्नीशन टेक्नॉलॉजी असणार आहे. ऑक्टोबर अखेर पर्यंत ही संपुर्ण यंत्रणा कार्यान्वीत होईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिली आहे.

loading image
go to top