

Mumbai Local Crime
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये मागील काही महिन्यांपासून हिंसक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. ट्रेनमधील प्रवाशामंध्ये होणारे वाद आणि भांडणांचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात होत असल्याचे प्रकरण उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये घडला आहे, ज्यामध्ये दोन प्रवाशांमधील वादाचा फटका एका भलत्याच निष्पाप प्रवाशाला बसला आहे.