Mumbai Local: मुंबईकरांचं वेळापत्रक कोलमडणार, सर्व लोकल मार्गांवर मेगाब्लॉक; कसं असेल नियोजन? वाचा सविस्तर

Mumbai Local Megablock: उपनगरी रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक देखभालीची कामे केली जाणार आहेत.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक देखभालीच्या कामांसाठी रविवारी (ता. ३१) मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्लादरम्यान अप आणि डाऊन मार्गांवरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com