

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी २४ मे रोजी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धोम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप-डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नाही, दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील.