
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकलबाबत म्हत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.