Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

Mumbai Local Megablock: मध्य रेल्वेवर सोमवार-मंगळवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होणार असल्याची शक्यता आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : दिवा स्थानकाच्या दक्षिण टोकाला (सीएसएमटी बाजू) उभारण्यात येत असलेल्या नवीन पादचारी पुलासाठी गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेकडून सोमवार-मंगळवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ३०० टन क्षमतेच्या रोड क्रेनच्या सहाय्याने पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यात येणार आहेत. हा ब्लॉक सोमवारी रात्री उशिरा १२.१० ते मंगळवारी पहाटे ४.१० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com