

Mumbai Local Service Disrupted
ESakal
मुंबईत पुन्हा एकदा लोकल सेवा कोलमडल्याचे दिसून आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. वांद्र्याकडे जाणारी लोकल वडाळा स्थानकात खोळंबली आहे. यामुळे मागील गाड्या थांबल्या आहेत. तांत्रिक अडचणीमुळे हार्बर मार्गाचे वेळापत्रक कोलमडले आहे.