

Mumbai local train 2 shocking incident
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हत्या, मारहाण, शिवीगाळ असे प्रकार लोकलमध्ये घडत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इतकेच नव्हे तर लोकलमध्ये महिला डब्यात पुरुष व्यक्ती घुसून अश्लील चाळे करत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. असाच एक प्रकार लोकलमध्ये घडल्याचे प्रकरण समोर आले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.