मुंबईकरांनो उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळा आणि रेल्वेने केलेल्या पर्यायी सुविधा

कुलदीप घायवट
Saturday, 30 January 2021

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 31) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

मुंबई, ता. 29 : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता. 31) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बरवरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मध्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बरवरून जाण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

महत्त्वाची बातमी : अकरावी प्रवेशाची अखेरची यादी लागली; अजूनही ऍडमिशन झाली नसेल तर कशी घ्याल ऍडमिशन?  जाणून घ्या

कुठे : भायखळा-माटुंगा अप व डाऊन जलद मार्ग 

कधी : सकाळी 11.5 ते दुपारी 4.5 वाजेपर्यंत 

परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. भायखळा ते माटुंग्यादरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या नियोजित वेळापत्रकानंतर 15 मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहचतील. माटुंग्यानंतर निर्धारित मार्गावर चालविण्यासाठी जलद सेवा जलद मार्गावर वळविण्यात येतील. 

महत्त्वाची बातमी :  शिवसेना घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, भेटीचं कारण आहे अत्यंत महत्त्वाचं

कुठे : कुर्ला-वाशी अप व डाऊन 

कधी : सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 

परिणाम : सीएसएमटीहून सुटणारी वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी हार्बरवरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत कुर्ला रेल्वेस्थानकावरून विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे. 

मुंबई. ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कुठे : बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्ग 

कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 

परिणाम : बोरिवली आणि गोरेगाव अप-डाऊन लोकल सेवा ब्लॉकवेळी जलद मार्गावर धावेल. काही उपनगरी लोकल रद्द केल्या जातील.  

mumbai local train updates megablock news on central western and harbor line

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai local train updates megablock news on central western and harbor line