

Mumbai Local Train Passengers Fight
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लोकलमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. धावत्या लोकलमध्ये प्राध्यापकांवर हल्ला आणि मयंक लोहार हत्येची घटना ताजी असताना लोकलमध्ये १२ तासांत चार धक्कादायक घटना घडल्या आहेत. मारहाण, धमकी आणि पेपर स्प्रेच्या प्रकार धावत्या लोकलमध्ये घडले आहेत. अशातच अंधेरी ते विरार दरम्यान ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.