Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

Western Railway : लोकलच्या एका डब्यात छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली. यामुळे रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजना पूर्ण झाल्याचा दावा फोल ठरला आहे.
 Water leaking from Mumbai Local Train roof

Water leaking from Mumbai Local Train roof

ESakal

Updated on

मुंबई : पावसाळ्यापूर्वी लोकलच्या डब्यांची सर्वंकष तपासणी आणि गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण झाल्याचा पश्चिम रेल्वेचा दावा पहिल्याच मुसळधार पावसात फोल ठरल्याचे चित्र समोर आले आहे. बोरिवलीहून विरारच्या दिशेने धावणाऱ्या लोकलच्या एका डब्यात छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळू लागल्याने प्रवाशांना डब्यातच पावसाचा सामना करावा लागला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या देखभाल व्यवस्थेवर टीकेची झोड उठली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com