

A Mumbai local train women coach where a man entered disguised in a burqa, triggering safety concerns among female passengers.
esakal
Mumbai local train incident : मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बुरखा घातलेला एक पुरूष घुसला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. महिला प्रवाशांना संशायस्पद हालचाली आढळल्याने त्याला पकडले आणि त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला.
दरम्यान महिलांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर घाटकोपर स्थानकाजवळ पोहोचताच तो चालत्या ट्रेनमधून उडी मारून विरुद्ध दिशेने कर्जतला जाणारा लोकल ट्रेनमध्ये चढून पळून गेला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सीएसएमटीला जाणारी लोकल ट्रेन घाटकोपर स्थानकावर येणार असताना ही घटना उघडकीस आली. महिलांच्या डब्यात बुरखा घातलेला पुरूष शिरल्याचं पाहून महिला प्रवाशांनी त्याला घेरले आणि त्याची चौकशी करू लागल्या. काही महिला प्रवाशांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला.
यानंतर काही महिला प्रवाशांनी तो व्हिडिओ पोलिसांना दाखवला आणि त्याच्यविरुद्ध तक्रारही नोंदवली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे रेल्वेमधील महिला सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.