Mumbai Local Women Coaches: मुंबई लोकलमध्ये सर्व महिला डबे एकत्र जोडण्याचा प्रस्ताव; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चाही विचार

मुंबई लोकलमध्ये महिला प्रथम श्रेणी व सामान्य महिला डबे एकत्र आणण्याचा रेल्वेचा सकारात्मक विचार; कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा, सीसीटीव्ही देखरेख व गस्त एका ठिकाणी केंद्रित करण्याची तयारी
A proposal to place all women coaches together and introduce 'Pink Stopping Points' at railway stations is under consideration to strengthen women's safety in Mumbai suburban trains.

A proposal to place all women coaches together and introduce 'Pink Stopping Points' at railway stations is under consideration to strengthen women's safety in Mumbai suburban trains.

Sakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महिला प्रथम श्रेणी आणि सामान्य महिला डबे एकाच ठिकाणी जोडण्याची मागणी उपनगरीय प्रवासी महासंघाने रेल्वेकडे केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याने, सर्व महिला डबे एकाच ठिकाणी असल्यास कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून त्याचा अभ्यास सुरू केला आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्या उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती (एसआरयूसीसी) बैठकीत महिला डबा सहज ओळखता यावा, यासाठी स्थानकांवर 'पिंक स्टॉपिंग पॉइंट' सुरू करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com