Mumbai Local: दिव्यांगांच्या लोकल डब्यांत घुसखोरी, वर्षभरात २३ हजार प्रवाशांकडून २४ लाखांचा दंड वसूल
Mumbai Local Train Disable Person Coach: दिव्यांगांच्या लोकल डब्यांत घुसखोरी होत असल्याचे आरपीएफच्या आकडेवारीतून समोर आले आहे. याप्रकरणी २३ हजार प्रवाशांकडून २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतील दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे.