सकाळी पहिली ट्रेन ते ७ पर्यंत आणि रात्री १० ते शेवटच्या ट्रेनपर्यंत मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा ?

सकाळी पहिली ट्रेन ते ७ पर्यंत आणि रात्री १० ते शेवटच्या ट्रेनपर्यंत मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाची मुभा ?
Updated on

मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या दुपटीचा दर देखील जवळजवळ वर्षभराचा झालाय. खरंतर युरोपातील कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली होती. कालच राज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे 8 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 5 रुग्ण हे मुंबईतील आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक शहर म्हणून मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगली जातेय.

याशिवाय दिवाळीमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय का यावर देखील नजर ठेवली मुंबई महापालिकेकडून नजर ठेवली जात होती. मात्र मुंबईकरांच्या मदतीने मुंबई महानगर पालिकेने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळवलं आहे. अशात आता पुन्हा चर्चा सुरु झालीये ती म्हणजे मुंबईकरांची लाईफ लाईन असणाऱ्या मुंबई लोकलमधून मुंबईकरांना प्रवासाची परवानगी कधी मिळणार याची. 

या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने मुंबईकरांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा आता मिळू शकते. सर्वसामान्य नागरिकांना सकाळच्या पहिल्या ट्रेनपासून सकाळी सात वाजेपर्यंत तर रात्री दहानंतर शेवटच्या ट्रेनपर्यंत लोकलमधून प्रवासाची मुभा मिळू शकते. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  मुंबई महापालिकेने या संदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. 

mumbai local trains mumbikar likely to get travel permission before 7 am and after 10 pm

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com