esakal | सायन-पनवेल मार्गावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'ट्रॅफिक जाम'
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic-Jam

सायन-पनवेल मार्गावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'ट्रॅफिक जाम'

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

सरकारच्या ट्रेन सुरू न करण्याच्या भूमिकेचा नागरिकांना बसतोय फटका

मुंबई,ता.12: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सायन-पनवेल महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबईत कामावर पोहचणाऱ्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले आहे. (Mumbai Local Trains still closed for General Public so Sion Panvel Road is traffic jammed)

हेही वाचा: भेंडी बाजारात दुकानं उघडी असतात, मग फक्त हिंदुंच्या वस्तीत कारवाई का? - संदीप देशपांडे

सायन पनवेल महामार्गावर सकाळच्या सत्रात वाहतूक कोडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा हा एकमेव सायन-पनवेल महामार्ग आहे. ज्यामुळे पुण्यावरून मुंबईत मंत्रालय किंवा एका दिवसात काम करून परत जाण्याच्या विचारात असलेल्या वाहतुकदारांना सोमवारी रस्त्यावरच उशिरापर्यंत अडकावे लागले आहे. शिवाय वाशी टोल नाक्यांवर सुद्धा वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या यामध्ये सर्वाधिक असून, पुणे आणि पनवेल आणि आजूबाजूच्या शहरातून येणाऱ्या वाहनांची या वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

हेही वाचा: निर्बंध हटवा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार; दादरच्या व्यापाऱ्यांचा इशारा

दरम्यान, 5 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सुमारे आहे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ वाहतुकदारांना लागताना दिसून आला असून, कोंडीत अडकलेल्या वाहतुकदरांनी या वाहतूक कोंडीचे व्हिडिओच समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे. तर वाहतुकदारांकडून संताप सुद्धा व्यक्त केला जात आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image