Mumbai Local Viral Photoesakal
मुंबई
Mumbai Local Viral Photo : एसी लोकलमध्ये प्रवाशाचा भन्नाट कारनामा; चक्क ट्रेनमध्ये छत्री उघडून प्रवास करतानाचा फोटो व्हायरल!
Mumbai Local Viral Photo : या व्हायरल फोटोत एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्या गर्दीत एक प्रवासी शांतपणे उभा आहे आणि त्यानं हातातली छत्री (AC Train Umbrella Incident) उघडून ठेवली आहे.
मुंबई : मुंबईची लोकल ट्रेन ही लाखो (Mumbai Local Viral Photo) प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज प्रचंड गर्दीतून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील अनेक किस्से, फोटो व व्हिडिओ सतत सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. अशाच एका घटनेने सध्या नेटकऱ्यांच्या उत्सुकतेचा विषय निर्माण केला आहे. एसी लोकलमध्ये छत्री उघडून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.